शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 23:28 IST

उलवे नोड येथील घटना : कथित पत्रकाराला न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी केली अटक

उरण : बातमी प्रसारित करून व्यवसाय बंद करण्याची धमकी देऊनही खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या एका लोकल न्यूज चॅनेलच्या कथित पत्रकाराने उलवे येथील दूध डेअरीच्या मालकावर पिस्तूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली. उलवे नोडमध्ये हा प्रकार घडला. न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी आशिष चौधरीला(५२) पिस्तुलासह अटक केली आहे. उलवे येथे उजाला दूध डेअरी आहे. त्याच्या मालकाकडून या आधीही धमकावून आशिष पैसे वसूल करीत होता. रविवारीही (२७) आशिषने मालकाला धमकावण्यास सुरुवात केली होती.

लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन न करता, दूध डेअरीचा व्यवसाय करीत असल्याची उलवे न्यूज युट्युब चॅनलवर बातमी प्रसारित करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन त्याने दोन हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, मालकाने मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आशिषने जवळच असलेल्या पिस्तूलमधून शैलेंद्र कुमार रामशरण यादव (३२) यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने नेम चुकल्याने शैलेंद्र बचावले. या प्रकरणी शैलेंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला पकडल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीसांनी दिली.आशिष उलवे येथील रहिवासी आहे. तो उलवे न्यूज चॅनलच्या नावाने युट्युबवर बातम्या प्रसारित करीत असतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार