शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रोड, अवैध पार्किंगवर चर्चा

By admin | Updated: January 13, 2017 06:12 IST

जेएनपीटी परिसरात होणारी वाहतूककोंडी आणि सर्व्हिस रोडच्या प्रश्नाबाबत गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने

उरण : जेएनपीटी परिसरात होणारी वाहतूककोंडी आणि सर्व्हिस रोडच्या प्रश्नाबाबत गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जेएनपीटी बंदर उभारणीनंतरही परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे अपघातांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी चौथ्या बंदराच्या उभारणीपूर्वी सर्व्हिस रोड बनविण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांचीही भेट घेतली होती. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या वेळी सर्व्हिस रोड बनविण्याचे आणि करळ रेल्वे फाटक खुले करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनानंतरही अद्याप करळ रेल्वे फाटक खुले करण्यात आलेले नाही, तसेच सर्व्हिस रोडचाही प्रश्नही सुटला नाही. त्यामुळे दोन्ही समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी आणि जेएनपीटीचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या कार्यालयासमोर ३ जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषणाची दखल घेऊन जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. जेएनपीटी प्रशासन भवनात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. चर्चेत मनसेचे जिल्हा सचिव केसरी पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष विजय तांडेल, उरण शहर अध्यक्ष जयंत गांगण, सोनारी सरपंच शोभा म्हात्रे, रूपेश पाटील, अभिजित कडू, वैभव भगत तसेच जेएनपीटीचे प्रबंधक एन. के. कुलकर्णी, नॅॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीचे मॅनेजिंग टेक्निशियन आर. एम. जिरांगे तसेच जेएनपीटीचे अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)