सराईत दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: November 18, 2016 02:10 IST2016-11-18T02:10:22+5:302016-11-18T02:10:22+5:30

ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह मुंबईत विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

Saraiet Daughters arrested | सराईत दरोडेखोरांना अटक

सराईत दरोडेखोरांना अटक

विरार : ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह मुंबईत विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून माणिकपूर येथील दरोड्यातील ४३ हजार रुपयांच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.
सन पनीकर (२२. रा. घाटकोपर), मोईद्दीन शेख (२२, विरार), गिरीष नार (३२, विरार), विशाल चव्हाण (२८, विरार) आणि तेजस सोनावणे (२३, विरार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने मैत्री पार्कमधील एका बिल्डींगमध्ये दरोडा टाकून ५३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध पालघर आणि ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्ी, खून, खूनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (वार्ताहर)

Web Title: Saraiet Daughters arrested