शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर रस्त्यावर वाळूचा सडा

By admin | Updated: January 13, 2017 06:10 IST

महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून जाणारा म्हाप्रल पंढरपूर रस्ता हा येथील वाळू

दासगाव : महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून जाणारा म्हाप्रल पंढरपूर रस्ता हा येथील वाळू व्यावसायिकांचा महत्त्वाचा मार्ग झाला आहे. मुळातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यावर ठिकठिकाणी वाळू सांडल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्यावर सांडलेली वाळू आणि वाहनांची वर्दळ यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.म्हाप्रल पंढरपूर हा रस्ता महाड तालुक्यातून जातो. वराठी चिंभावे ते तुडील या रस्त्यावर तीन ते चार वाळू साठवण आणि विक्री हे प्लांट आहेत. या भागातून पुणे, खेड, भोर, महाबळेश्वर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. या वाहतुकीकरिता प्रामुख्याने म्हाप्रळ पंढरपूर रस्त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लांब वाहतूक असल्याने हे वाहतूकदार गाडीमध्ये जास्तीत जास्त वाळू भरतात. छोटे-मोठे खड्डे आणि गतिरोधक यावर गाडी आदळताच गाडीच्या फाळक्यातून अगर वरून वाळू सांडते. सातत्याने अशाप्रकारे वाळू सांडल्याने या रस्त्यावर वाळूचा सडा पडला आहे. ही अवस्था ओवळे, जुई, कुंभळे, रावढळ, सव, तुडील आदी गावांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. मुळातच हा रस्ता खराब असून त्यावर सांडलेली ही वाळू आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. मात्र, येथील स्थानिक वाहतूक करणाऱ्या मिनीडोअर रिक्षांना याचा त्रास होत आहे. तर सांडलेल्या वाळूचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्ता निसरड झाला आहे. यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताची भीती वाढली आहे. या धुळीचा त्रास रस्त्यालगत असणाऱ्या रहिवाशांना होऊन त्यांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. (वार्ताहर)खाडी पट्ट्या विभागात असलेल्या वाळू डेपोमधून मोठ्या प्रमाणात ट्रक व्दारे ओव्हर लोड वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू रस्त्यावर सांडत असून या सांडलेल्या वाळूमुळे छोट्या-मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. - अण्णा अहमदखान देशमुख, समाजसेवक, खाडी पट्ट्या विभागात