शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव

By admin | Updated: September 22, 2015 03:40 IST

प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत.

अजित मांडके, ठाणेप्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने उचललेल्या एका पावलासोबत आता ठाणेकर प्रवाशांचे असंख्य पावले जोडली जाऊ लागली आहेत. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्यांना रिक्षाचालकांबरोबर आलेले अनुभव शेअर केले आहेत. त्यामुळे आता विनाकारण हॉर्न वाजविणे बंद कर, या मोहिमेनंतर ‘रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून दे’, या लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीला आणखी यश येऊ लागले आहे.‘काहीतरी कर ठाणेकर’ चळवळीला आता चांगलेच यश लाभण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नंबरवर अनेकांनी मेसेज टाकून त्यांना रिक्षाचालकांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्यांना कशा पद्धतीने रिक्षाचालकांनी लुबाडले, भाडे कसे नाकारले, याचेही अनुभव कथन केले आहेत. तसेच काही रिक्षाचालकांनीही या नंबरवर फोन करून त्यांच्या व्यथाही मांडल्या आहेत. त्यामुळे आता घोडबंदर येथील एका गृहस्थाने त्यांना आलेला अनुभव शेअर करताना सांगितले की, मानपाड्याला रिक्षाने आलो असता, त्याला शंकर मंदिराकडे जाण्यास विनंती केली असता, त्याने जाण्यास नकार दिला. उलट, त्या ठिकाणी लांबून जावे लागेल, असे सांगून त्याने नकार दिला. त्याला शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अरेरावी सुरूकेली. ठाणे स्टेशन ते हरिनिवास सर्कलपर्यंत रिक्षाचालकाला सांगितले असता, त्याने रिक्षा रिकामी असतानाही येण्यास नकार दिल्याचे राजेश शिरोडकर यांनी सांगितले.रात्री ८ नंतर गावदेवी येथील एका रिक्षाचालकाला ओवळा येथे मीटरने येणार का, असे विचारले असता, त्याने थेट २०० रुपये होतील, असे सांगितले. मात्र, मीटरने येण्यास नकार दिल्याची माहिती दीपक जाधव यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर शेअर केली आहे. अशा प्रकारे भाडे नाकारणे, जवळच्या ठिकाणी येण्यास नकार देणे, सायंकाळच्या वेळेस रिक्षा रिकाम्या असतानाही सीएनजी भरायचे असल्याचे कारण देत रिक्षाचालक येण्यास नकार देतात. काहींनी रिक्षाचालकांचे चांगले अनुभवही सांगितले आहेत. यात जवळचे अंतर असले तरी काहीही काचकूच न करता काही चालकांनी येण्यास तयारी दर्शविल्याचेही अनुभव प्रवाशांनी कथन केले आहेत.