शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलव्हॅन चालकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी; गिरीश गुणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST

विद्यार्थीवाहक संस्था आणि आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कार्यक्रम

कळंबोली : पनवेल विद्यार्थीवाहक संस्थेतील ४५० स्कूलव्हॅन चालकांच्या माध्यमातून १६ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यांच्या सानिध्यात विद्यार्थी किमान एक - दीड तास असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी व्हॅनचालकांवर असल्याचे मत डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले. रविवारी विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२० निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेलमधील गोखले सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, हरेश बेतावडे, अ‍ॅड. शुभांगी झेमसे, ज्योती देशमाने, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, लक्ष्मी आय क्लिनिकचे सचिन भूमकर, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, सचिन पोलादे, अनिल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला रक्तदान, आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्कूलव्हॅनच्या परिवहन आणि वाहतूक विभागाकडून विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओकडून दिले जाते. मात्र, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहकांची मानसिकता कधी तपासली जाते का? असा प्रश्न गुणे यांनी उपस्थित केला. स्कूलव्हॅन चालकांच्या मानसिकतेवर उद्याचे चांगले नागरिक घडू शकतात. त्यामुळे आगामी काळामध्ये विद्यार्थीवाहक संस्थेकडून याकरिता विशेष व्याख्यान आयोजित करण्याचा सल्ला या वेळी डॉ. गिरीश गुणे यांनी दिला.

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी, विद्यार्थीवाहकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल रिक्षा विद्यार्थीवाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी केले.विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात उपक्रमांना मार्गदर्शन करताना मान्यवर.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र