शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हरित लवादाचा फटकार

By admin | Updated: September 25, 2015 02:27 IST

पीएनपी जेटी विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लवादाने दट्ट्या दिल्याने सरकारसह रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे

आविष्कार देसाई, अलिबागपीएनपी जेटी विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लवादाने दट्ट्या दिल्याने सरकारसह रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतीच पीएनपी जेटीची पाहणी केली. समितीचा अहवाल सरकारला लवकरच सादर करण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. याबाबतची अंतिम सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे.सरकारने सुमारे ८० च्या दशकामध्ये मेरीटाईम बोर्डाला मोठ्या संख्येने जमीन भाडेपट्ट्याने दिली होती. जिल्ह्यात नव्याने बंदरांचा विकास व्हावा यासाठी मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या वाटेला आलेल्या जमिनीपैकी सुमारे ७० गुंठे जमीन पीएनपी जेटीला विकासाकरिता दिली होती. मात्र पीएनपीने जेटीचा विकास करताना दिलेल्या पेक्षा जास्त जमिनीचा वापर करणे, सीआरझेड कायद्याचा भंग, पर्यावरण कायद्याला पायदळी तुडविणे, अनधिकृत बांधकाम करणे, खारफुटीचा ऱ्हास करणे अन्य कायदे धाब्यावर बसविल्याबाबत सुरेंद्र ढवळे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सप्टेंबर २०१४ मध्ये तक्रार दाखल केली होती. २३ सप्टेंबर २०१५ ला सुनावणी झाली. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.राज्य सरकारला यामध्ये पार्टी करण्यात आल्याने खरी परिस्थिती काय आहे याची विचारणा सरकारने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यावर अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने १० सप्टेंबर २०१५ ला धरमतर परिसरात पीएनपी जेटीची पाहणी केली. शिंदे हेच त्यावेळी गैरहजर होते. मेरीटाईम बोर्डाचे अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. अलिबाग तहसीलदार, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागाचा अहवाल समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना लवकरच देण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी उगले अहवाल सादर करतील, असेही तहसीलदार सकपाळ यांनी सांगितले.