शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम मोडण्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे

By admin | Updated: November 2, 2015 01:48 IST

तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे पाच दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली.

नवी मुंबई : तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे पाच दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली. शाळा व महाविद्यालय आवारात राबवलेल्या या मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे.भरधाव वेगात वाहन चालवत स्टंट करण्याची तरुणांमधली मानसिकता वाढत चालली आहे. त्यांच्या या जीवघेण्या प्रकारामुळे रस्ते अपघातात जखमी अथवा मृत होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने पाच दिवसांची कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवलेल्या गेलेल्या या मोहिमेंतर्गत चार पथकांनी परिमंडळ १ व २ मधील विविध शाळा व महाविद्यालयांबाहेर ही मोहीम झाली. त्यामध्ये एकूण ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याप्रकरणी तब्बल ७३४ विद्यार्थ्यांवर कारवाई झालेली आहे. अनेकदा मुलगा शाळेत असतानाच किंवा कॉलेजची पायरी चढला की पालकांकडून त्याचे हट्ट पुरवले जातात. त्यामध्ये मोटारसायकल हा तरुणांचा सर्वाधिक हट्ट पालक सहज पूर्ण करतात. मात्र मोटारसायकल घेऊन कॉलेजला जाताना त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होतेय का, याची कसलीही चौकशी ते करीत नाहीत. यामुळे भरधाव वेगात वाहन चालवण्याच्या प्रयत्नात तरुणांचे अपघात होत आहेत. तर अपघात झाल्यानंतरही केवळ हेल्मेट नसल्यामुळे गंभीर जखमी अथवा मृत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांसोबतच हेल्मेटच्या वापराच्या महत्त्वाबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचे साळवे यांनी सांगितले. याकरिताच नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील शाळा-महाविद्यालय परिसरात कारवाईची मोहीम राबवण्यात आली. कामोठे पोलीस ठाण्याच्या परिसरातच आजही अनेक अवैध टपऱ्या उभ्या आहेत. (प्रतिनिधी)