शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पोस्टमनची कमतरता

By admin | Updated: September 30, 2015 00:16 IST

तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पनवेल : तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टपाल खात्यांतर्गत पत्र, तार, मनीआॅर्डर, मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट आदी मुख्य सेवा पुरवल्या जातात. यात तार सेवा आता बाद झाली असली तरी मनीआॅर्डर- मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट सेवेला आजही नागरिकांकडून विश्वासाने पसंती दिली जात आहे. याशिवाय शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिले, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, परमिट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहितीपत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जातात. नवीन पनवेल येथे मुख्य पोस्ट कार्यालय असून त्या अखत्यारीत खांदा वसाहत, कामोठे, पनवेल ही पोस्ट कार्यालये येतात. या चारही कार्यालयांतर्गत मोठा परिसर येत असून जवळपास साडेतीन लाखांची लोकवस्ती आहे. या पट्ट्यात एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे पत्रांची आवक - जावक जास्त असते त्याचबरोबर इतर अनेक कामांचा ताणही अधिक असतो. कार्यालयीन काम संगणकीकृत झाले असले तरी पत्र वाटपाची भिस्त पोस्टमनवरच असते. या चार कार्यालयात मिळून फक्त ३0 पोस्टमन कार्यरत असून एका एकावर पाच ते सहा सेक्टरची जबाबदारी देण्यात आली असून आजही बहुतांश पोस्टमन सायकलचाच वापर करतात किंवा पायी फिरतात. आजारपण, सुट्या यामुळे प्रलंबित कामांचा भार वाढत जातो. या कारणाने वेळेत टपाल देणे अनेकदा अशक्य होते. या परिसराला किमान ३८ पोस्टमनची आवश्यकता असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.