शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मतदार याद्यांमध्ये महाघोळ

By admin | Updated: March 16, 2017 03:17 IST

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. नवीन पनवेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची नावे गायब झाली असल्याची तक्र ार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अनेकांचे नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून गुरुवारी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नव्याने प्रभाग रचना झाली आहे. प्रभागाचे प्रारूप जाहीर झाले आहेत त्याचबरोबर बदललेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या नव्याने तयार करण्यात आल्या. मतदार याद्या नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींचे हक्काचे मतदान दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. नवीन पनवेलमधील अनेकांचे नावे पनवेल आणि खांदा वसाहतीत गेली आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग क्र मांक १७ मधील काही मतदारांची नावे प्रभाग २0मध्ये गेली आहेत. पनवेल शहर, तक्का, नवनाथनगर झोपडपट्टीत अनोळखी नावे आली असल्याचा आरोप अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केला आहे. प्रभाग १४ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले सेक्टरमधील मतदार यादीतून गायब झाले आहेत. याबाबत आम्ही अगोदरच उपायुक्त मंगेश चितळे, भगवान खाडे आणि गणेश साळवी यांना माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रारूप यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हा प्रकार काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर केला असल्याचा आरोप सुध्दा भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केला आहे. भगवान खाडे यांना निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, सी. सी.भगत, श्रीकांत ठाकूर उपस्थित होते.