शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस’ गाड्यांचा दबदबा

By admin | Updated: October 31, 2015 00:20 IST

शासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईशासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे. खाजगी वाहनांवर बिनधास्तपणे पोलीस नावाची पाटी लावत आहेत. पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही वाहतूक विभागाची कारवाई टाळण्यासाठी व टोल वाचविण्यासाठी या पाट्यांचा वापर करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत असतात. गतवर्षी तब्बल दीड लाख वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास तीन कोटी रूपये दंड वसूल केला होता. यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर सर्वाधिक ७३५८१ जणांवर कारवाई केली होती. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीस स्वत:च मात्र बिनधास्त कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सरकारी वाहन सोडून खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु यानंतरही नवी मुंबईमधील बहुतांश ९५ टक्के पोलीस कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू लागले आहेत. कारमध्ये पोलीस नावाची पाटी लावलेली असते.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या केलेल्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी लावलेली असते. साध्या गणवेशामध्ये असल्यानंतर सर्वांना कळावे या गाडीवर पोलीस आहेत, यासाठी स्टीकर लावले जाते. टोलमध्ये सूट मिळविण्याचाही काही जण प्रयत्न करतात. नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसते. रोडवर वाहने उभी केली की कारवाई केली जाते. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहीत आहेत. ज्या वाहनांवर ही पाटी असेल त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. याचाच गैरफायदा पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही घेवू लागले आहेत. ज्यांचा या विभागाशी काहीही संबंध नाही त्यांच्या वाहनांवरही पोलीस लिहिले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर गुन्हेगारही त्यांच्या गाडीवर पोलीस लिहतील असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी दिसते. ५० पेक्षा जास्त मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात ४ ते ५ कार व २० ते ३० मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते.पोलीस व प्रेस लिहिलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस शक्यतो कधीच कारवाई करत नाहीत. यामुळे शहरात १ हजारपेक्षा जास्त वाहनांवर प्रेसच्या पाट्या झळकत आहेत. त्याच्यापेक्षा काही पट वाहनांवर पोलीस लिहिलेले असते. या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे भविष्यात गुन्हेगार अशा पाट्या लावून वाहनांचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची भीतीही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.