शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी थकविले एनएमएमटीचे ४.५ कोटी

By admin | Updated: October 29, 2015 23:50 IST

ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एनएमएमटीच्या प्रवास भाड्याचे साडेचार कोटी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापनाचा संबंधित आयुक्तालयांकडे पाठपुरावा सुरू आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एनएमएमटीच्या प्रवास भाड्याचे साडेचार कोटी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापनाचा संबंधित आयुक्तालयांकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून पोलीस विभागाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे परिवहन व्यवस्थापन चक्रावून गेले आहे. एनएमएमटीकडून पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. प्रवास भाड्याची ही रक्कम वर्षाला एनएमएमटीकडे जमा होणे अपेक्षित असते. परंतु मागील सहा वर्षांपासून पोलिसांकडून एकही पैसा एनएमएमटीला मिळालेला नाही. याचा परिणाम म्हणून परिवहन उपक्रमाचे तब्बल साडेचार कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीची ही रक्कम ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची आहे. ती वसूल करण्यासाठी व्यवस्थापनाचा गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या परिवहन उपक्रमाला आपले आर्थिक गणित जुळविताना कसरत करावी लागत आहे. महापालिकेची परिवहन सेवा तोट्यात आहे. उत्पन्न आणि खर्च यात मेळ बसविण्यासाठी उपक्रमाला महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. महिन्याला जवळपास पावणेदोन कोटी रुपये एनएमएमटीला महापालिकेकडून घ्यावे लागतात. विशेष म्हणजे मागील दोन अडीच वर्षात एनएमएमटीच्या कारभारात सुधारणा झाली आहे. मासिक तोट्यातही काही प्रमाणात घट झाली आहे. परिवहनच्या दृष्टीने ही समानधानकारक बाब असली तरी पोलिसांकडील साडेचार कोटींची थकबाकी ही व्यवस्थापनाची डोकेदुखी ठरली आहे.