शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्क्याचे भूखंड

By admin | Updated: November 11, 2015 00:03 IST

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करण्याकरिता जेएनपीटी व राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलजेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करण्याकरिता जेएनपीटी व राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली असून त्यासाठी महिनाभर विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. १९ नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरूवात होणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी भरत शितोळे यांनी दिली.सिडकोने संपादित केलेल्या बारा गावची जमीन जेएनपीटीला हस्तांतरित करण्यात आली. मात्र भूधारकांना योग्य मोबदला देण्यात आला नाही. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्यामुळे सिडकोने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे शासनाने मान्य केले. मात्र आजपर्यंत साडेबारा टक्के योजनेचा लाभ मिळाला नाही. विधानसभा निवडणूक होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेएनपीटी येथे आले होते. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेचे पत्र देण्यात आले होते. मात्र संबंधित शेतकरीच काय कर कोणालाच भूखंड मिळाले नाही त्यामुळे जेएनपीटी विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.एक दीड महिन्यापूर्वी पंतप्रधानांना स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचा होत असलेला उद्रेक पाहून राज्य शासनाने या कामी पुढाकार घेतला. त्याचबरोबर जेएनपीटीनेही सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार लाभार्थी खातेदार आणि मयत खातेदारांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेवून यादी तयार करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी शितोळे यांनी सांगितले.