शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पावणेतीनशे मोबाइल टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:24 IST

पनवेल महापालिकेची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम जोरात सुरू

कळंबोली : पनवेल महापालिकेची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम जोरात सुरू आहेच, त्याचबरोबर चाळ, झोपडपट्ट्या तसेच ट्रक पार्किंगच्या ठिकाणी २८० मोबाइल टॉयलेट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.पनवेल शहरात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आतापर्यंत १८०८ जणांना अनुदान दिले. केंद्र सरकार ४०००, राज्य सरकार ८००० आणि उर्वरित ८००० रुपये महापालिकेकडून देण्यात आले. महापालिका हद्दीत १० सीटची २४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. नादुरु स्त शौचालये दुरुस्त करण्यात आली आहेत. याशिवाय, पालिकेला २५० मोबाइल टॉयलेट सामाजिक संस्थांकडून देण्यात आली आहेत. ही शौचालये झोपडपट्टी, बैठ्या चाळी असलेल्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत.कळंबोली रोडपाली येथे मोकळ्या भूखंडावर अवजड वाहने उभी केले जातात. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नसल्याने चालक क्लीनअर उघड्यावरच प्रात:विधीकरिता बसतात. त्यांच्यासाठीसुद्धा अशाप्रकारे शौचालयांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. याशिवाय नावडे उड्डाणपूल, एमआयडीसीत मोबाइल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. कळंबोली वसाहतीत पावसाळी नाल्याच्या बाजूला झोपड्या आहेत, तिथेही महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दोन झोनमध्ये १३० मोबाइल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित चार झोनमध्ये हे काम सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.