शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 00:17 IST

वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी बेकायदा चौथी सीट बंद केल्याचे निमित्त साधत रिक्षा संघटनेने प्रवाशांना वेठीस धरले आहे.वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर धावणाऱ्या रिक्षांच्या भाडेदरात शुक्रवारपासून वाढ झाली आहे. रिक्षाचालक-मालक एकता युनियनने झालेल्या या दरवाढीचा फलक स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर लावलेला आहे. परंतु अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे रिक्षाचालकांसोबत वाद होऊ लागले आहेत. यापुर्वी वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १०, तर कोपरखैरणेपर्यंत २० रुपये घेतले जायचे. मुळात सन २०१४ च्या आरटीओच्या दरपत्रकानुसार हे दर कमीच होते. मात्र आरटीओने वाशी-कोपरखैरणे मार्गावर शेअर रिक्षासाठी २८ रुपये दराची मान्यता दिलेली असतानाही रिक्षाचालक स्वत:च्या सोयीनुसार २० रुपये भाडे आकारत होते. तर दर कमी केल्याच्या बदल्यात रिक्षात बेकायदा चौथा प्रवासी घेतला जायचा. यामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गावर सर्रास चौथा प्रवासी घेऊनच रिक्षा चालवल्या जात होत्या. मात्र त्याकडे अनेक दिवस डोळेझाक केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ही कारवाई टाळत होणारा तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालक संघटनेने प्रवास भाड्यात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुधारित दरानुसार वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १५, तर कोपरखैरणे पर्यंत २५ रुपये भाडे आकारायला सुरुवात केली आहे. हे दर आरटीओची मान्यता असलेल्या २८ रुपयांपेक्षा कमीच असल्याने त्यात काही गैर नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. मात्र आरटीओने जेव्हा भाडेवाढ करायला मान्यता दिलेली तेव्हाच ती लागू न करता त्यात सोयीनुसार बदलाचे अधिकार रिक्षा संघटनांना दिले कोणी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. तसेच रिक्षात चौथा प्रवासी घेणे बेकायदेशीर असतानाही आरटीओ व वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांचे लाड कशासाठी पुरवायचे, असाही संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यावरून वाशी रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा स्टँडवर रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामध्ये रिक्षाचालकांची अरेरावीची भाषा सहन करावी लागत असल्याचा संताप महेश जाधव या प्रवाशाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)यापूर्वी आरटीओने २८ रुपयांची मान्यता दिलेली असतानाही १० व २० रुपये दर आकारले जात होते. त्याऐवजी चौथा प्रवासी रिक्षात घेतला जायचा. नुकतीच चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवासभाड्यात पाच रुपयांची भाडेवाढ केली आहे.- सुनील बोर्डे, अध्यक्ष, रिक्षाचालक-मालक एकता युनियन