शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड किल्ल्यावर महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: December 9, 2015 00:56 IST

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामार्फत ८ ते १२ जानेवारी २०१६ ला रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

अलिबाग : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामार्फत ८ ते १२ जानेवारी २०१६ ला रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रायगडावर हजारोंच्या संख्येने गर्दी होणार असल्याने या गर्दीचे आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करणे जिल्हा प्रशासनापुढे आव्हान ठरणार आहे. त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत हा महोत्सव पार पाडणे हे सुध्दा प्रशासनासाठी जिकिरीचे ठरणार आहे. याबाबतची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायक इतिहास सर्वांना माहिती व्हावा आणि पर्यटनवृध्दी होण्यासाठी रायगड महोत्सव १६ चे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने पर्यटक यामध्ये सामील व्हावे यासाठी १५ डिसेंबरला सांस्कृतिक विभाग एका वेबसाईटचे प्रकाशन करणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सशुल्क नोंदणी करुन या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. रायगडावर १५ हजार आणि पाचाड येथील २५ हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. जिजामाता राजवाड्याजवळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सलग चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन ८ जानेवारीला दुपारनंतर होणार आहे. ९ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग जिवंत करण्यात येणार आहेत.याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिजामाता वाड्याजवळ राजमहल उभारण्यात येणार असून त्या काळातील बाजारपेठही तेथे निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. (प्रतिनिधी)