शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल आरटीओबाहेरील दलालांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:13 IST

पनवेल प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात अर्जदारांची पनवेल प्रादेशिक कार्यालयाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात अर्जदारांची पनवेल प्रादेशिक कार्यालयाबाहेर गर्दी जमत असून याचा फायदा घेत दलाल आर्थिक व्यवहार करून परमिट वाटपाचे व्यवहार करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने १७ जुलै रोजी ‘रिक्षाचे परवाने दलालांच्या कचाट्यात’ या मथळ्याखाली बातमीदेखील प्रकाशित केली होती. यासंदर्भात परिवहन आयुक्त लक्ष्मण दरोडे यांनी अशाप्रकारच्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळंबोली पोलीस ठाण्याला अशा व्यक्तीची माहिती देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे . मोटार वाहन विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यक्ती येत असल्याचा आणि ते कायदेशीर घ्यावयाच्या शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्र ारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे देखील प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पत्रान्वये परिवहन आयुक्तांनी पनवेल प्रादेशिक कार्यालयाला दिले होते. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १८ जुलै रोजी ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल येथील प्रादेशिक कार्यालयात पाहणी केली असता अनधिकृत एखादी व्यक्ती परिवहन कार्यालयात फिरताना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिवहन कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीकडून जादा पैसे उकळले असल्यास अशा व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे हेमांगिनी पाटील यांनी केली आहे.