'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:00 PM2019-09-15T16:00:49+5:302019-09-15T16:13:49+5:30

आज (रविवार) नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

NCP MP Amol Kolhe Target State Government On Advertisement | 'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

Next

नवी मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज (रविवार) नवी मुंबईतराष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सरकारच्या जाहिरातींवर सडकून टीका केली आहे.

नवी मुंबईतील मेळाव्यात अमोल कोल्हें म्हणाले की, महाराष्ट शासन न केलेली काम तुमच्या आमच्या माथी मारण्यासाठी राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकाराची प्रत्येकी तासाला 10 जाहिराती दाखविली जाते, एक जाहिरातीसाठी साधरणत: 12 हजार रुपये इतका खर्च करवा लागतो. त्यामुळे राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्याचप्रमाणे 2014च्या निवडणुकीनंतर समजले की पूर्वी आई- वडिल सांगायचे जाहिराती बघून तेल आणि साबण यांच्यासारख्या वस्तू निवडायच्या असतात सरकार निवडायचे नसते, असं म्हणत त्यांनी शासनाच्या जाहिरांतींवर टीकास्त्रं सोडलं आहे.

अमोल कोल्हेंनी याआधी देखील शिवस्वराज्य यात्रेत  माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात. मात्र जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचा साधा पोरगा फक्त साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आला नसता असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राजीनामा देण्यास तयार असून आता ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन-अडीच लाखांनी निवडून नाही आलो, तर माझं नाव बदला असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिले होते.

Web Title: NCP MP Amol Kolhe Target State Government On Advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.