शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खासदार निधीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:38 IST

शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सानपाड्यामध्ये व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी दिला आहे. परंतु स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सानपाड्यामध्ये व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी दिला आहे. परंतु स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी याविषयी नकारात्मक भूमिका घेवून प्रस्ताव स्थगित केला आहे. यामुळे शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला. नवी मुंबईमधील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी त्यांचा जास्तीत जास्त निधी याठिकाणी वापरण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून सानपाडा दत्त मंदिरजवळ नवीन पादचारी पूल बांधून घेतला आहे. जुईनगर रेल्वे वसाहतीमधील रखडलेली कामे मार्गी लावली असून तुर्भे व बेलापूरमधील रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्याचा प्रश्नही नुकताच मार्गी लावला आहे. सानपाडा सेक्टर ५ मधील गावदेवी मैदानामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यासाठी ५० लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. येथील मैदानामध्ये ८४ चौरस मीटर भूखंडावर व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याविषयी प्रस्ताव तयार केला आहे. पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव स्थायी समिती सभागृहात मांडला होता. राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्यांनी याविषयी नकारात्मक भूमिका मांडली. अशोक गुरखे यांनी या मैदानामध्ये जावून पाहणी केली पाहिजे अशी भूमिका घेतली. याशिवाय ४० प्लस संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असून इतर कारणे सांगनू हा प्रस्ताव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँगे्रसने प्रस्तावास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत किती विकास कामांच्या ठिकाणी जावून पाहणी केली असा प्रश्नही उपस्थित केला. जर राष्ट्रवादी मनमानी करणार असेल तर आम्हाला सभात्याग करावा लागेल अशी भूमिका नामदेव भगत व द्वारकानाथ भोईर यांनी मांडल्यानंतरही सभापतींनी प्रस्तावाला स्थगिती दिली.विकासकामांना विरोध करण्याची भूमिका चुकीची आहे. आम्ही या घटनेचा निषेध करून सभात्याग केला. खासदार निधीतून काम होत असल्याचे विरोधाची भूमिका घेण्यात आली आहे. - नामदेव भगत, नगरसेवक, शिवसेना यापूर्वी रूग्णालयामध्ये व्हेंटिलेटर खरेदीसाठी खासदारांनी निधी देवूनही त्याचा उपयोग केला नाही. मनपाने आलेला निधी परत पाठविला. आता पुन्हा विरोध करणे चुकीचे असून आम्ही याचा निषेध करत आहोत. - द्वारकानाथ भोईर, गटनेते, शिवसेना