शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

वाढत्या प्रदूषणावर वृक्षलागवडीचा उपाय, नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:14 AM

नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल नुकताच सर्वसाधारण सभेमध्ये मांडला.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरामध्ये तब्बल ६७,५५२ वृक्ष लावले आहेत. ट्री बेल्ट विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल नुकताच सर्वसाधारण सभेमध्ये मांडला. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरामधील हवाप्रदूषण कमी केले नाही तर भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेने फक्त काँक्रीटचे जंगल उभे करण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गत वर्षभरामध्ये तब्बल ३१ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.

अडवली व भुतावली परिसरामध्ये वनविभागाबरोबर त्रिपक्षीय करार करून २५ हजार वृक्ष लावले आहेत. महापालिकेची उद्याने, दुभाजक, मोकळे भूखंड, रोडच्या बाजूची जागा व इतर ठिकाणीही वृक्षलागवड केली जात आहे. राबाडा येथे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. दहा वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या टेकडीवर दाट वनराई विकसित केली आहे. सानपाडामध्ये निसर्गप्रेमी नागरिकांनी रोड व मोकळ्या भूखंडावर हिरवळ विकसित केली आहे.

महापालिकेने ट्री बेल्ट व उद्यानांमधील वृक्ष संवर्धनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे; पण एमआयडीसीतील वृक्ष संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. गतवर्षी दिघा धरणाच्या पायथ्याशी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीची सोय नसल्याने अनेक रोपे कोमेजली आहेत. यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वृक्षलागवडीचा आकडा महत्त्वाचा नाही. लागवड केलेल्यापैकी प्रत्यक्ष किती वृक्ष जगले याचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.80ठिकाणी मोकळ्या जागाशहरात तब्बल ८० ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, यामध्ये सीबीडीमध्ये २२, नेरुळमध्ये सात, सानपाडामध्ये एक, वाशी व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी ११, घणसोलीमध्ये सात, ऐरोलीमध्ये नऊ, पामबीच रोडवर दहा व ठाणे-बेलापूर रोडवर दोन ठिकाणांचा समावेश आहे. दोन लाख ८४ हजार चौरस मीटरवर मोकळी जागा असून तेथेही वृक्षलागवड केली जात आहे. आठ ठिकाणी ट्री बेल्ट विकसित केले आहेत.शहरातील उद्याने व मोकळ्याजागांचा तपशीलविभाग उद्याने क्षेत्रफळसीबीडी ३८ ४७४२८नेरुळ ३३ १४५५८२सानपाडा, तुर्भे १३ ७०७०५वाशी ३३ १६६०२३कोपरखैरणे १५ ५०१०८घणसोली ०५ ९८७२ऐरोली २५ १०९५४९ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई