शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नाईक समर्थकांनी लावला महापालिकेला चुना

By admin | Updated: September 17, 2015 00:05 IST

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी न घेता एक हजारपेक्षा जास्त होर्डिंग लावले होते.

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी न घेता एक हजारपेक्षा जास्त होर्डिंग लावले होते. पालिका आर्थिक संकटात असताना सत्ताधारी पक्षानेच फुकटची जाहिरातबाजी करून हजारो रुपयांचा महसूल बुडविल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बंद झाला आहे. उत्पन्न कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होवू लागला आहे. मंजूर केलेली अनेक कामे थांबविण्यात आली आहेत. मोठे प्रकल्प पुढील वर्षभरात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसने आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यामध्ये जाहिरात व परवाना विभागाचे कामकाज चांगल्या पद्धतीने केले तर उत्पन्नात वाढ होवू शकते असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले होते. परंतु सभागृहात चर्चा करणारे लोकप्रतिनिधीच मात्र प्रत्यक्षात विनापरवाना होर्डिंग लावून शहर विद्रूप करत असून पालिकेचा महसूलही बुडवत आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा १५ सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात १० ते २० होर्डिंग लावले होते. यामधील ८० टक्के होर्डिंगला परवानगीच घेण्यात आली नव्हती. विनापरवाना होर्डिंग लावल्यामुळे महापालिकेचा महसूल बुडाला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पालिकेचे नुकसान करत असल्यामुळे इतर पक्षांचे पदाधिकारीही विनापरवाना होर्डिंग लावत आहेत. नाईक यांनी स्वत: होर्डिंगबाजी करू नका. पुष्पगुच्छ देवू नका, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असताना कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त स्वत:ची जाहिरात करून घेतली असून शहरवासीयांनी मात्र याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)