‘टेंबा’ला जानेवारी २०१६ चा मुहूर्त

By Admin | Updated: October 1, 2015 01:42 IST2015-10-01T01:42:31+5:302015-10-01T01:42:31+5:30

गेल्या दोन वर्षांपासून रुग्ण सेवेच्या बहुप्रतिक्षेत असलेले भार्इंदर पश्चिमेकडील पालिकेचे टेंबा रुग्णालय सुरु होण्यासाठी प्रशासनाने यंदा जानेवारी २०१६ चा मुहूर्त शोधला आहे.

The month of January 2016 in 'Temba' | ‘टेंबा’ला जानेवारी २०१६ चा मुहूर्त

‘टेंबा’ला जानेवारी २०१६ चा मुहूर्त

भार्इंदर : गेल्या दोन वर्षांपासून रुग्ण सेवेच्या बहुप्रतिक्षेत असलेले भार्इंदर पश्चिमेकडील पालिकेचे टेंबा रुग्णालय सुरु होण्यासाठी प्रशासनाने यंदा जानेवारी २०१६ चा मुहूर्त शोधला आहे.
शहरात २०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय सुरु करण्यासाठी तत्कालिन पालिका आयुक्त सुदाम गायकवाड यांनी राज्य शासनाला लेखी ग्वाही दिल्याने मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा ते पालिकेनेच सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. २००९ मध्ये ४ मजली इमारत बांधण्याला त्यावेळच्या महासभेने मंजुरी दिल्यानंतर त्याचा ठेका किंजल कंस्ट्रक्शनला दिला. पुढे त्याचा खर्च सुमारे ५५ टक्यांनी वाढून तो आजमितीस सुमारे १५ कोटींवर गेला आहे. या रुग्णालयाचा पसारा चालविण्यास असमर्थ वाटू लागताच आॅगस्ट २०१२ मध्ये ते राज्य शासन अथवा धर्मदाय किंवा सामाजिक संस्थेकडे हस्तांतर करण्याचा ठराव त्यावेळच्या महासभेने मंजूर केला होता. त्याला मान्यता मिळावी यासाठी पालिकेने उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. परंतु, तो फेटाळून पालिकेलाच ते सुरु करण्याचे आदेश २०१४ मध्ये न्यायालयाने दिल्याने प्रशासनाने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात टप्प्या-टप्प्याने रुग्णालय सुरु करण्याचे नमूद करुन मार्च २०१५ पर्यंत पहिल्या टप्प्यातील ५० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचे म्हटले होते. परंतु, त्याचा खर्च परवडणारा नसल्याने पालिकेने त्याच्या खर्चाला सुसह्य करण्यासाठी अशासकीय देणग्या स्वीकारण्याच्या ठरावाला महासभेकडून मंजुरी मिळविली. त्यानंतरही प्रशासनातील भोंगळ कारभाराचा फटका त्याला बसू लागल्यान ते लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रशासनाने आयुक्तांच्या विशेष अधिकारात रुग्णालय अधिक्षकांची अलिकडेच नियुक्ती केली आहे. यामुळे ते वेळेत सुरु व्हावे, यासाठी सततच्या आढावा बैठकीत रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक कामांचा निपटारा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच त्यात रुग्णसेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाने जानेवारी २०१६ चा मुहूर्त निश्चित केला आहे. याबाबत रुग्णालय अधिक्षक डॉ. आर. बी. कुळकर्णी यांनी सांगितले की, हे रुग्णालय जानेवारी २०१६ मध्ये टप्प्या-टप्प्यात सुरु करण्यात येणार असून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.

Web Title: The month of January 2016 in 'Temba'