शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने दिली विकासाला चालना

By admin | Updated: July 4, 2017 07:25 IST

मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारतसारख्या अभिनव योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारतसारख्या अभिनव योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाने (एमईडीसी)आयोजित केलेल्या १३व्या डॉ. डी.आर. गाडगीळ स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने भारताच्या नवीन आर्थिक परिस्थितीमधील बदल या विषयावर अलीकडेच प्रभू यांनी व्याख्यान दिले. यावेळी प्रभू म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत जीडीपी वाढत होता; परंतु उत्पादन क्षेत्राचे त्यातील योगदान फारसे नव्हते. जीडीपीतील उत्पादन क्षेत्राचे योगदान वाढविणे आवश्यक होते. प्रभू यांनी आपल्या भाषणात दिवंगत डॉ. डी. आर. गाडगीळ यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सहकारी संस्था आणि कॉपोर्रेट यांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होईल आणि त्याचा खूप मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनाही पुरवठा साखळीचा फायदा मिळाला पाहिजे. आज, शेतकऱ्यांचे त्यांनीच घेतलेल्या उत्पादनावर कोणतेही नियंत्रण नाही. यात बदल झाला तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, असे प्रभू म्हणाले. पाण्यावरील विशेष पुस्तिकेचे प्रकाशन एमईडीसीचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी संस्थेच्या साठ वर्षांच्या इतिहासाला उजाळा दिला. आपल्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त एमईडीसीने पाण्यावरील एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशन केले. याप्रसंगी जलस्रोत विभागाचे उपसचिव डॉ. संजय बेलसरे, जैन इरिगेशनच्या दिलीप कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.