शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्योत्सवात राष्ट्रशांतीचा संदेश देणार

By admin | Updated: August 13, 2015 00:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी एक भव्य स्वातंत्र्योत्सव साजरा करणार

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी एक भव्य स्वातंत्र्योत्सव साजरा करणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यपर्वात नवी मुंबई शहरात राष्ट्रशांतीचा संदेश दिला जाणार असून बेलापूर विधानसभा क्षेत्रात मानवी साखळीद्वारे पाच हजार मीटर लांबीचा राष्ट्रध्वज फडकविला जाणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या कार्यक्रमात ५००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सेंट झेविअर्स हायस्कूल नेरूळ, बाळाराम पाटील हायस्कूल दारावे अशा अनेक शाळांमधील विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेत कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्राईड आॅफ नेशनच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाद्वारे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. या कार्यक्रमात पामबीच रोड येथील एन.आर.आय. कॉलनी, नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नलपर्यंत रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूस मानवी साखळी तयार केली जाणार आहे. यामध्ये बेटी बचाव, बेटी पढाओ, स्वच्छता की ओर एक कदम, पाणी वाचवा अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. प्राईड आॅफ नेशनचे कासीम यांनी हा राष्ट्रध्वज तयार केला असून या माध्यमातून देशाप्रतिचे प्रेम व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, अशी माहिती प्राईड आॅफ नेशनचे कंपनीचे कासीम यांनी दिली. (प्रतिनिधी)