शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना लाल दिव्याचा मोह

By admin | Updated: September 29, 2015 00:50 IST

महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसविणे नियमात बसत नाही. यानंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे

नवी मुंबई : महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसविणे नियमात बसत नाही. यानंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या गाडीवर दिवा बसविण्यात आला होता. याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री, मंत्री व इतर अतिमहत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या वाहनावर लाल दिवा बसविण्यात येतो. परंतु मागील काही वर्षामध्ये महापौरांसह अनेक पदाधिकारी लाल दिव्याचा वापर करू लागले होते. यानंतर शासनाने परिपत्रक काढून महापौरांना त्यांच्या गाडीवर लाल दिवा वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईचे महापौर सागर नाईक हे लाल दिवा वापरत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी दिव्याचा वापर केला नव्हता. विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सुरवातीच्या काळात दिव्याचा वापर केला नव्हता. परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशी मात्र त्यांनी गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. पद, प्रतिष्ठेचा फारसा विचार न करता ते नागरिकांमध्ये मिसळत असतात. पालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीयांना सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ देत असल्यामुळे शहरात त्यांच्याविषयी सकारात्मक संदेश जावू लागला आहे. परंतु रविवारी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी त्यांनाही लाल दिव्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या गाडीवरील दिवा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. छायाचित्रकारांनी गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर वाहनचालकांनी आमच्याकडे अध्यादेश असल्याचे सांगितले. परंतु तो दाखविण्यास सांगितल्यानंतर मात्र ते काहीही बोलले नाहीत. (प्रतिनिधी)