शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने जपल्या आबांच्या स्मृती

By admin | Updated: November 9, 2015 02:50 IST

महापालिकेला मोरबे धरण विकत घेण्यास व इतर विकासकामांसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती पालिकेने जपल्या आहेत

नवी मुंबई : महापालिकेला मोरबे धरण विकत घेण्यास व इतर विकासकामांसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती पालिकेने जपल्या आहेत. नेरूळमध्ये १२ हजार चौरस मीटर भूखंडावर उभारण्यात आलेल्या भव्य उद्यानास त्यांचे नाव देण्यात आले असून शनिवारी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतल्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. हे धरण विकत घेण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांनी सहकार्य केले होते. नवी मुंबई परिसरातील डान्स बार बंदीही तेच गृहमंत्री असताना झाली. शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते झाले होते. त्यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्या यासाठी महापालिकेने त्यांच्या नावाने भव्य उद्यान उभारावे यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक रवींद्र इथापे व त्यापूर्वी सुरेखा इथापे यांनी पाठपुरावा केला होता. पालिकेने सेक्टर १९ मधील १२ हजार चौरस मीटर भूखंडावर उद्यान विकसित केले असून त्याला स्वर्गीय आर. आर. पाटील स्मृती उद्यान असे नाव दिले आहे. या उद्यानात ८०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, योगा पार्क, मुलांसाठी खेळणी, याशिवाय ५ मीटर त्रिज्येचे सौर घड्याळ बसविण्यात आले आहे. उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, अविनाश लाड, संजीव नाईक, नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, सागर नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.