शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या मूर्तींवर अखेरचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:42 IST

गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

प्राची सोनवणे ।नवी मुंबई : गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. माती, रंग, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तीमध्ये २० टक्के दराने वाढ झाली आहे. गणेशचतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरु वात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी मजुरीमध्ये २०० ते २५० रुपयांनी वाढ केली आहे. मोठमोठ्या गणेश मंडळांबरोबरच आता घरगुती गणपतींमध्ये नावीन्यपूर्ण मूर्तीला वाढती मागणी आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.शाडूच्या मूर्तीच्या किमतींमध्ये झालेली वाढ, तसेच हाताळण्यास नाजूक असल्याने मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. मूर्तीसाठी वापरल्या जाणाºया सोनेरी, चंदेरी रंगांच्या किमती वाढल्या आहेत. चित्रपट, मालिकांमधील नावाजलेल्या भूमिका, पात्र अशा मूर्ती तयार करून घेण्याचा आग्रह मूर्तिकारांकडे केला जात असून त्याकरिता भाविकांनी सहा महिने अगोदरही मूर्तीचे बुकिंग केले आहे. बाहुबली, बाजीराव, जय मल्हार, लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती अशा अवतारातील मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.नवी मुंबईतील सायली कला केंद्र या चित्रशाळेत सध्या तिसरी पिढी श्री मूर्ती घडवित आहे. तरु ण मूर्तिकारांनी आजोबांकडून मूर्ती घडविण्याचे धडे घेतले असून अभियांत्रिकी, एमबीए, पदवी शिक्षणानंतरही नोकरी सांभाळून या कुटुंबातील तरुण मूर्ती साकारत आहे. पिढ्यानपिढ्या मूर्ती घडवित असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ती मूर्ती घडविण्याच्या कामात सहभागी होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या कामात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असल्याची प्रतिक्रि या मूर्तिकार जनार्दन नाईक यांनी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेली कित्येक वर्षे या चित्रशाळेत शाडू मातीपासून मूर्ती तयार केल्या जात आहेत. यंदा वाढत्या मागणीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. सण, उत्सव साजरे करताना आजूबाजूच्या पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा मोलाचा सल्ला मूर्तिकार नाईक यांनी दिला. पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन या कार्यशाळेतील तरुण मूर्तिकारांकडून करण्यात आले.