शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खारघर स्थानकात सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 2, 2015 02:10 IST

नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

पनवेल : नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या रेल्वे स्थानकातून दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून स्थानकातील समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने रेल्वेचे मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही. ए. मिलनरॉय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर रेल्वे स्थानकात पूर्ण वेळ स्टेशन मास्तर नाही. तिकीट खिडक्यांजवळ इंडिकेटर नाही, बंद असलेल्या तिकीट खिडक्या, फलाटावरील बंद असलेले पंखे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आरक्षणाची व्यवस्था नाही, अस्वच्छता असे विविध प्रश्न प्रवाशांना येथे भेडसावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, खारघर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, रेल्वेला याठिकाणाहून दीड ते दोन कोटींचे उत्पन्न मिळते. तरी देखील अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ असल्याची प्रतिक्रि या खारघरचे शिवसेना उपविभाग प्रमुख रामचंद्र देवरे यांनी दिली. या समस्या सोडविण्याचे निवेदन रेल्वेच्या मंडळ वाणिज्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव घरत, शाखा प्रमुख हरिश्चंद्र वारंग, रमेश सावंत, नितीन कचरे, उत्तम मोर्बेकर, हरी कांबळे आदी कार्यक र्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)