शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:47 IST

आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

नवी मुंबई - कोरोनासारख्या परिस्थितीत सरकार एक निर्णय घेत आहे, तर सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षांचे मंत्री वेगळा निर्णय घेत आहेत. आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वारंवार निर्णय बदलले जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोविड रुग्णालये आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आले होते. त्या वेळी नवी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी  आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या लढाईत आम्ही सरकारच्या सोबत असल्याचे फडणवीस म्हणाले.नवी मुंबईतील बाजारपेठेमधून शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून, या ठिकाणी स्क्रीनिंग आणि जलद टेस्टिंग करण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू झाली पाहिजे. रुग्णालयांनी बिलासाठी तगादा लावू नये, यासाठी महापालिकेने व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे, अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवीन वाहने घेणे प्राथमिकता नाहीकोरोनाचे संकट असताना मंत्र्यांनी नवीन वाहने घेण्यासाठी प्राथमिकता देण्याची गरज नसल्याचे फडणवीस यांनी सांगत, वाहनामध्ये काही समस्या असल्यास स्वत:ची वाहने वापरली जाऊ शकतात. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्यात आले आहेत. दिवसरात्र कर्तव्य निभावणाºया पोलिसांना आवश्यक बाबी देण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाते. अनावश्यक कामे केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती स्थिर झाल्यावर नवीन वाहने खरेदी करता येतील, असे ते म्हणाले.कार्यकारिणीत कोणालाही डावलले नाहीभारतीय जनता पक्षाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर झाली. त्याविषयी फडणवीस म्हणाले, भाजपची कार्यकारिणी जम्बो आहे. राज्यात १२ उपाध्यक्ष, १२ मंत्री, ५ महामंत्री असतात. कार्यकारिणीमध्ये काही सदस्य, काही निमंत्रित आणि काही विशेष निमंत्रित असतात. त्याप्रमाणे, सर्वसमावेशक कार्यकारिणी झालेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणाची काही फारशी नाराजी नसेल, असे वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे