शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान

By admin | Updated: December 11, 2015 01:21 IST

तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे

कर्जत : तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे. कोंढाणेपासून अंबिवलीपर्यंत आणखी सहा मोठे सिमेंट बंधारे बांधण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयोजन आहे.कर्जत तालुक्यात वाहणारी उल्हास नदी सुरुवातीच्या टप्प्यात उन्हाळ्यात कोरडी असते. पुढे पेज नदीचे पाणी उल्हास नदीमध्ये जावून मिळते. त्यानंतर उल्हास नदी कल्याण खाडीपर्यंत जात असताना बारमाही होते. मात्र कोंढाणेच्या भागातील जंगलात उगम झालेल्या या उल्हास नदीचे पात्र पाणी कुठेही अडविले गेले नसल्याने उन्हाळ्यात कोरडे पडते. त्यामुळे सुरु वातीपासून या भागातील शेतकरी उन्हाळ्यात प्रचंड संकटात होते. सालपे, कोंदीवडे अशी पुढे तमनाथ भागात येणारी उल्हास नदी कोरडी असल्याने स्थानिक लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रासात असायचे, मात्र पाटबंधारे विभागाने कोंढाणेपासून चांदईपर्यंत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम केले, त्याचा परिणाम चांगला होऊन उन्हाळ्यात कोरडे असलेले उल्हास नदीचे पात्रपाणी साठ्यामळे भरु न गेले आहे. दुसरीकडे आणखी काही जागा आहे, तेथे पूर्वीचे सिमेंट बंधारे आहेत, परंतु ते मोडकळीस आले आहेत. अशा काही ठिकाणी भरपूर पाणी साठा होऊ शकतो. त्यामुळे प्राधान्याने त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. कर्जत पाटबंधारे विभागाने अशा काही साईट शोधून ठेवल्या होत्या आणि तेथे सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन देखील होते. मात्र कोंढाणेपासून चांदई-अंबिवलीपर्यंत सहा ठिकाणी बांधले जाणारे सिमेंट बंधारे गेली अनेक महिने प्रस्तावित आहेत. त्यांची कामे सुरु केल्यास उल्हास नदीच्या कोरड्या पात्रात झालेली जलक्र ांती सर्व परिसराच्या पाणीदृष्ट्या फायद्याची ठरेल. (वार्ताहर)