शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचे ‘ते’ १० नगरसेवक अपात्र

By admin | Updated: April 15, 2015 22:56 IST

या पालिकेचे १० बंडखोर नगरसेवक अपात्र ठरविण्यास पात्र असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जव्हार : या पालिकेचे १० बंडखोर नगरसेवक अपात्र ठरविण्यास पात्र असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम १९८६ व नियम १९८७ अन्वये दाखल प्रकरणी सुनावणीमध्ये वादी व प्रतिवादी यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. वरील नमूद नियमाच्या कलम (६) प्रमाणे युक्तीवाद हे दिवाणी प्रकिया संहिता १९०८ मधील तरतूदी व विधिमंडळाच्या तरतुदींशी सुसंगत असावे लागतात. त्यामुळे प्रतिवादी यांच्या विरूध्द जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दोषारोप ठेवणे आवश्यक असल्याचा निर्णय सोमवारी दिलेला आहे. जव्हार नगर पालिकेच्या राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाच्या १४ सदस्यांनी एकत्र येऊन नमुना ३ नियम ४ (१) भरून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदस्यत्व पत्करले असून त्याप्रमाणे गटनेत्याची निवड केली होती, दि. १९/१२/२०१४ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या १० सदस्यांनी एकत्र येऊन स्वेच्छेने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडून जव्हार विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे सदर १० सदस्य महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधि. १९८६ च्या कलम ३ (१) (ऐ) अन्वये अपात्रतेस पात्र आहेत. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधि. १९८६ च्या कलम ५ प्रमाणे पक्षांतराच्या कारणावरून झालेली अपात्रता विलीनी करणाच्या बाबतीत लागू होत नाही. परंतु सद्य स्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदर १० सदस्य हे दुसऱ्या कोणत्याही पक्षात सामिल झालेले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांसाठी गटनेता यांनी दि. १९/१२/२०१४ रोजी व्हीप जारी करून दि. २०/१२/२०१४ रोजीच्या सभेस हजर राहण्यास कळविले होते परंतु त्यास प्रतिवादी नगरसेवकांनी गैरहजर राहून त्याचा अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधि. १९८६ च्या कलम ३ (१) (बी) प्रमाणे अपात्र होण््यास पात्र आहेत त्यामुळे या १० नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार टांगती आहे. (वार्ताहर)