शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी गार्डनप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा

By admin | Updated: February 17, 2015 22:58 IST

बालाजी गार्डन टॉवरला परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त मधुकर अर्दड यांना दिले आहेत.

डोंबिवली : बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून उभारलेल्या आयरे येथील बालाजी गार्डन टॉवरला परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त मधुकर अर्दड यांना दिले आहेत.
रस्ता नसताना तो असल्याचे भासवून नियमबाहय पध्दतीने बांधकाम मंजूरी मिळविल्याचे बालाजी गार्डन प्रकरणात २०१० मध्ये उघड झाले.
याप्रकरणातील वास्तूविशारद तसेच विकासक यांच्यावर ठोस कारवाई व्हावी असा ठराव तत्कालीन स्थायी समिती आणि महासभेने केला होता. त्यानुसार विकासकावर एमआरटीपी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली तर वास्तूविशारदाला काळया यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान काही भूधारकांच्या जमिनी दाखवून बांधकाम परवानग्या मिळविल्याचा प्रकार यात घडला होता.
याप्रकरणी भूधारक दशरथ पाटील यांनी या अनियमिततेची तक्रार २०१० मध्येच नगरविकास विभागाकडे केली होती.
त्यांच्या मालकीचे ५ हजार चौ.मी जागेचे क्षेत्र दिलेल्या बांधकाम मंजूरीमधून वगळण्यात यावे, सीआरझेड मधील बांधकाम तोडण्यात यावे आणि संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या मालकीच्या जागेबरोबरच गावदेवी देवस्थान आणि अन्य तिघांच्या जागेचे क्षेत्रफळ दाखवून चटई क्षेत्र (एफएसआय) वापरले असून यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने चार परवानग्या मिळविल्याचा त्यांचा आरोप आहे.
एकत्रित जागेचा सर्व्हे अद्यापही झालेला नाही अन्यथा या अनियमिततेचा भांडाफोड झाला असता असे त्यांचे म्हणणे आहे. बालाजी टॉवरमध्ये एकूण ८ इमारती आहेत़ यातील काही इमारतींना अद्यापपर्यंत वापर परवाना मिळालेला नाही तसेच यातील तीन इमारती अनधिकृत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
या प्रकरणात विकासक आणि वास्तूविशारदांने अवैधरित्या परवानग्या मिळविल्याचे उघड झाले असले तरी कागदपत्रांची शहनिशा न करता बांधकामाला परवानगी देणारे पालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन अधिकारीदेखील तितकेच दोषी आहेत.
चौकशीचे आदेश देताना तक्रारदाराच्या जागेचे क्षेत्र वगळून सुधारीत बांधकाम परवानगी देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही नगरविकास विभागाने नमूद
केले आहे. यात ठोस कारवाई झाली नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)