शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात घुसखोरी

By admin | Updated: September 26, 2015 00:47 IST

शहरात ड्रंक अँड ड्राइव्हमुळे फुटपाथवरुन प्रवास करणे धोक्याचे झाले असल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. असे असतांनाच थेट फुटपाथवरच वाहने पार्कींगची सुविधा टिळकनगरच्या नगरसेवकाने दिली आहे.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरात ड्रंक अँड ड्राइव्हमुळे फुटपाथवरुन प्रवास करणे धोक्याचे झाले असल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. असे असतांनाच थेट फुटपाथवरच वाहने पार्कींगची सुविधा टिळकनगरच्या नगरसेवकाने दिली आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर तर वाहने फुटपाथवर असल्याचे वेगळेच दृश्य या ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे ही सुविधा आहे की असुविधा असा सवाल उपस्थित होतो. अशाच प्रकारे आरोग्य केंदाच्या जागेवर नगरसेवकाने ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालय सुरु करण्याचा प्रताप केला आहे. अशा एकापेक्षा एक अफलातून कल्पनांनी येथील रहिवाशी हैराण झालेले आहेत.जुन्या पद्धतीने सोसायट्यांचा परिसर असल्याने वाहने वाढली तरी त्यांच्या पार्किंगची सुविधा नसल्याने हा तोडगा काढला. परिसर सुरक्षित रहावा यासाठी नगरसेवकाने सीसी कॅमेरे लावले. परंतु, असे असतांनाही कल्पना लिमये यांची हत्या तर झालीच. या प्रकरणातला हत्येकरी ६ महिने झाले तरी अद्यापही मोकाटच आहे. त्यामुळे सीसी कॅमेरे नावालाच आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. टिळकनगर पोलिसांनी या ठिकाणच्या कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. परंतु, त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे नगरसेवकाने दिलेली सुविधा ही अपुरी असल्याचे स्पष्ट होत आहे.विशिष्ट टापूतील नागरिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली का? अशीही चर्चा होते. उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांचा या परिसरात समावेश होतो. त्यामुळे गटारे-पायवाटा यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा मानस असून नगरसेवकास विशेष काहीही करता आले नाही. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा असून एका बँकेनजीक ते उभारण्यात येणार होते. परंतु त्यासाठी पाठपुरावा कमी पडला. येथे एकमेव गार्डन असून त्याच्या सुशोभिकरणाचे काम आता कुठे हाती घेण्यात आले आहे. अन्य एक भूखंड आरक्षित आहे, तो शाळेसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी साफसफाई नसल्याने तो पडिक आहे. त्याची सफाई करणे, त्यास खेळायोग्य करणे नगरसेवकाकडून राहीले. त्याखेरीज अन्य कोणतीही करमणुकीची अथवा मनोरंजनाची सुविधा नाही. गल्लीबोळातले रस्ते या ठिकाणीही आहेत.