शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन फसवणुकीत वाढ

By admin | Updated: December 14, 2015 01:37 IST

ई-मनीच्या वाढत्या वापरामुळे डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. कार्डधारकाचा थोडासा निष्काळजीपणा त्यांचे बँक खाते मोकळे करू शकतो.

नवी मुंबई : ई-मनीच्या वाढत्या वापरामुळे डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. कार्डधारकाचा थोडासा निष्काळजीपणा त्यांचे बँक खाते मोकळे करू शकतो. त्याची प्रत्यक्ष झळ सोसलेल्या ५०० कार्डधारकांच्या तक्रारी चालू वर्षात सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत.अद्ययावत तंत्रज्ञान व वाढते संगणकीकरण यामुळे आॅनलाइन शॉपिंगचा वापर वाढला आहे. त्याकरिता अनेकांनी आपल्या बँक खात्याच्या डेबिट कार्डवर आॅनलाइन खरेदीची सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी ई - मनीचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे काही जण टाळतात. परिणामी त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती चोरीला जावून त्याद्वारे फसवणूकीची शक्यता असते. काही बँकेतील ग्राहकांच्या डेबिट व क्रेडिट डाटा चोरून बाहेर विकलेला असू शकतो. बँकेच्या नावे फोन करणाऱ्या अज्ञाताला कार्डचा पिन दिल्याने झालेली फसवणूक अधिक आहे. तर काही प्रकरणात क्रेडिट कार्डची माहिती वापरून आॅनलाइन शॉपिंग करून फसवणूक होण्याचेही प्रमाण अधिक आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १०५३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४९४ तक्रारी डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या आहेत. मागील तीन वर्षात अशा गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. २०१२ साली १५४, २०१३ साली ३६१, २०१४ साली ५८० तर २०१५ मध्ये ४९४ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर सेलला यश आलेले आहे. मात्र बहुतांश गुन्हे राज्याबाहेरील टोळ्यांकडून झालेले आहेत. त्यांच्यापर्यंत पोचण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे खबरदारी हाच उपाय असल्याचे पोलिसांकडून डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)