शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या विचारांचा विदेशातही प्रसार

By admin | Updated: October 27, 2015 00:23 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारांचा जगभर प्रसार करण्यासाठी राजश्री शिवबा प्रसारक मंडळ पाच वर्षांपासून परिश्रम घेत आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईछत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारांचा जगभर प्रसार करण्यासाठी राजश्री शिवबा प्रसारक मंडळ पाच वर्षांपासून परिश्रम घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेसात लाख प्रतिमा भारतासह जगातील दहा देशांमधील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. अमेरिकेमध्येही महाराजांचे विचार रूजविण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध व व्यवस्थापन कौशल्याने जगभरातील इतिहासप्रेमींसह व्यवस्थापन शास्त्राचे धडे गिरविणाऱ्यांना प्रभावित केले आहे. अनेक देशांमधील नागरिक शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करत आहेत. नवी मुंबईमध्ये पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळानेही देश -विदेशातील घराघरांमध्ये छत्रपतींचे विचार पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वासुदेव कामत यांनी काढलेल्या शिवरायांच्या चित्राची प्रतिमा मोफत नागरिकांना वितरीत केली जात आहे. भारतामधील जवळपास सर्व राज्यांमध्ये ही प्रतिमा पोहोचविण्यात आली आहे. विदेशात अमेरिका, लंडन, मॉरिशस, दुबई, इस्त्रायल, पेरु, कतार, आॅस्ट्रेलिया, बहरीन, नायजेरिया यासारख्या देशांमध्येही महाराजांची प्रतिमा देण्यात आली आहे. मंडळाचे कार्यकर्ते फक्त प्रतिमा देत नाहीत, ज्या व्यक्तीला ही प्रतिमा दिली जाते त्यांना शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली जाते. महाराजांचे गड, कोट, किल्ले, त्यांचे व्यवस्थापन कौशल्य याची माहिती दिली जात आहे. शिवप्रेमींच्या कार्याने भारावून गेलेले विदेशी नागरिकही एकमेकांना भेटल्यानंतर ‘जय शिवराय’ म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, गडकिल्ले, मंदिर, शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय आणि खाजगी कार्यालयातही शिवकार्याविषयी माहिती दिली जाते. देशातील प्रत्येक घरात एक शिवप्रतिमा असावी या उद्देशाने ही संस्थेचे कार्य सुरु आहे. या संस्थेचे संस्थापक विजयदादा खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ फेब्रु्रवारी २०१० साली या संस्थेची स्थापना झाली. योगेश खिलारे हा अमेरिकेत शिवकार्याच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहे. तो अमेरिकेतील कार्निवल प्राईड क्रुझवर शेफ म्हणून कार्यरत आहे. त्या ठिकाणी काम झाल्यानंतर मिळणारा वेळ छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती देण्याचे व शिवरायांविषयी माहितीचा प्रसार करण्यासाठी खर्च करत आहे. राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गडकोट मोहिमांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. नि:स्वार्थपणे हजारो तरूण किल्ल्यांची साफसफाई करण्यापासून विविध उपक्रम राबवत असून संस्थेच्या कामाविषयी विदेशातील भारतीयांनाही आदर वाटू लागला असून ते विदेशात छत्रपतींचे विचार पोहोचविण्याचे काम करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महाराष्ट्रामध्येच नाही तर देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे. देशासह पूर्ण विश्वभर शिवरायांचे विचार पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवरायांची प्रतिमा व त्यांच्या कामाची माहिती विविध देशांमध्ये पोहोचविली जात आहेत. आतापर्यंत दहापेक्षा जास्त देशांमध्ये शिवकार्याचा प्रसार सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध गड, किल्ल्यांची साफसफाई व इतर उपक्रम राबविले जात आहेत. - विजयदादा खिलारे, संस्थापक, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ