शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना आशा न्यायाची

By admin | Updated: December 13, 2015 00:24 IST

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दिली जाणारी मेंटेनन्स, गार्डन्स आदी कामे एकत्र करून एकाच ठेकेदाराला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना रस्त्यांवर आणण्याचा

- वैभव गायकर,  पनवेलस्थानिक प्रकल्पग्रस्तांना दिली जाणारी मेंटेनन्स, गार्डन्स आदी कामे एकत्र करून एकाच ठेकेदाराला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना रस्त्यांवर आणण्याचा हा डाव असून सिडको जाणूनबुजून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना या कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पनवेल तालुका विकास मंडळाने केला आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना पत्र लिहून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देण्यात येणाऱ्या कामाची मर्यादा ३ लाखांपर्यंत असली तरी अंदाजपत्रकानुसार कामाची मर्यादा १५ लाखापर्यंत आहे. या कामांचे ई-टेंडरिंग काढून एका प्रकल्पग्रस्त ठेकेदाराला देण्यापेक्षा शासकीय नियमानुसार त्याचे ३ लाखापर्यंत समप्रमाणात ५ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना वितरित केल्याने प्रत्येक ठेकेदाराला उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होईल. मात्र सिडकोच्या ४ जून २०१५ रोजीच्या पत्रकानुसार गार्डन, पार्किंग, मेंटेनन्स, हाऊसकिपिंग अशी सर्व कामे एकत्र करून त्यांचे इस्टिमेट तयार केले जाणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना मिळणारी कामे कमी होतील. शासनाने नुकतेच पाच लाखांची मर्यादा कमी करून ३ लाखांपर्यंत ई -टेंडरिंग केले आहे. सिडकोने ९५ गावांच्या जमिनी संपादित केल्या यावेळी प्रत्येक घरात नोकरी देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र तसे झाले नाहीच जे प्रकल्पग्रस्त ठेकेदार ए २ ची कामे करून आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना देखील सिडकोचा दूर सारण्याचा डाव असल्याचा आरोप पनवेल तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केला आहे. सिडको ३ लाखापर्यंतची कामे देखील ई-टेंडरिंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त ठेकेदार करीत आहेत. सद्य$:स्थितीत शेकडो प्रकल्पग्रस्त ठेकेदार ए २ च्या कामावर आपली उपजीविका भागवत आहेत. सिडकोच्या निर्णयामुळे ठेकेदारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. कामाच्या स्वरूपावरून इस्टिमेट तयार केले जाते. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डावलण्याचा व ३ लाखांपर्यंतची कामे ई-टेंडरिंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको.