शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी सर्कलवर कोंडी

By admin | Updated: August 26, 2015 00:27 IST

पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नवीन पनवेलकर हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ही कोंडी अधिक होत असल्याचे काही

पनवेल : पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नवीन पनवेलकर हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ही कोंडी अधिक होत असल्याचे काही वाहनचालकांचे म्हणणे आहे. नवीन पनवेलकडून पनवेल शहर त्याचबरोबर महामार्गाकडे जाण्यासाठी एचडीएफसी सर्कलवरून जावे लागते. त्याचबरोबर नेरे व तळोजा एमआयडीसीकडे जा-ये करण्याकरिता याच मार्गाचा उपयोग होतो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. सरकारी तसेच खाजगी बँकांची कार्यालये, सिडको तसेच मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालयेही याच मार्गावर आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस येथील गर्दी वाढतच आहे.वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचडीएफसी सर्कलची रुंदी सहा वर्षांपूर्वी कमी करण्यात आली. याशिवाय याठिकाणी लाखो रुपये खर्चून सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सिडको, वाहतूक पोलिसांचा समन्वय नसल्याने याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाही. वाहनांच्या रांगा थेट सिडको कार्यालय, मोहिते रुग्णालय, ओरिएंटल बँक आणि महामार्गाच्या पुलापर्यंत जातात. विशेषत: शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी पुलावर स्कूल बस - व्हॅनची मोठी कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास उशीर होतो. अनेकदा नवीन पनवेलहून पनवेल गाठण्याकरिता पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेकदा रुग्णवाहिका सुद्धा पुलावर अडकून पडल्याने रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याचे प्रकारही घडले आहे. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)वाहनचालकांना फेरापनवेलकडून आलेल्या वाहनांना नवीन पनवेलकडे जायचे असेल तर त्यांना थेट अमरधामपासून वळसा घालून नवीन पनवेल उड्डाणपुलावर चढायचे असा फतवा पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कर्मचाऱ्यांनी काढला होता. आजही तीच परिस्थिती असून त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप होत असून आपले काम हलके करण्याकरिता पोलीस अशा प्रकारे शक्कल लढवीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.