शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘परदेशी’ पाहुण्याची डोकेदुखी

By admin | Updated: November 2, 2015 02:20 IST

सीवूडस येथील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एनएमएमटीच्या सदनिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणारा एक परदेशी पाहुणा व्यवस्थापनासाठी डोकेदुखीचा ठरला आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबर्ईसीवूडस येथील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एनएमएमटीच्या सदनिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणारा एक परदेशी पाहुणा व्यवस्थापनासाठी डोकेदुखीचा ठरला आहे. मागील १० वर्षांपासून या पाहुण्याने या सदनिकेवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे सदनिका रिकामी करण्यासंदर्भात व्यवस्थापनाने अनेकदा विनंती केली; मात्र या परदेशी पाहुण्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने आता या प्रकरणी थेट महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहेत. परिवहन व्यवस्थापकाच्या निवासासाठी सीवूड्स (फेज २) मधील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये एनएमएमटीच्या मालकीची एक सदनिका आहे. नियमानुसार ही सदनिका परिवहन व्यवस्थापकाला राहण्यासाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र मागील १० वर्षांपासून या सदनिकेत संतोषसिंग परदेशी हे शासकीय अधिकारी वास्तव्याला आहेत. परदेशी हे माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे विशेष कार्याधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी एक वर्ष ते महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून या सदनिकेचा ताबा त्यांच्याकडे आहे. या सदनिकेचा ताबा मिळविण्यासाठी मागील १० वर्षांत परिवहन व्यवस्थापनाने अनेकदा प्रयत्न केले. सत्तेचा वापर करून परदेशी यांनी व्यवस्थापनाचे सर्व प्रयत्न फोल ठरविले. मंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी असल्याचा दबाव आणून परदेशी यांनी वेळोवेळी सदनिका रिकामी करण्याचे टाळले. विशेष म्हणजे या कालावधीत व्यवस्थापकपदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना उपक्रमाची जागा असूनही निवासासाठी भाडेतत्त्वावरील घराचा आधार घ्यावा लागला. दरम्यान, नाईक आता मंत्री नसल्याने परदेशी त्यांच्या सेवेतून मुक्त झाले आहेत. सध्या ते मंत्रालयात कार्यरत आहेत. एकूणच परदेशी यांचा आता नवी मुंबईशी संबंध नाही. त्यामुळे त्यांनी एनएमएमटीच्या मालमत्तेचा ताबा सोडावा, असे व्यवस्थापनाला वाटते आहे. परदेशी यांना येथील सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याने कारवाई करण्यास व्यवस्थापनाचा धीर होत नसल्याचे बोलले जाते. असे असले तरी सदनिका रिकामी करण्यासाठी व्यवस्थापनाने आता थेट महापालिका आयुक्तांना साकडे घातल्याचे समजते.