लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे हरिश्चंद्र निरगुडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्र वार, ५ मे रोजी कळंब मंडळ अधिकारी विनायक सुतार यांच्या उपस्थितीत सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. पोशीर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अलका आवटे यांना जिल्हाधिकारी न्यायालय रायगड यांनी महिनाभरापूर्वी सरपंचपदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय दिला आहे. तेव्हापासून पोशीर ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी शुक्र वारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी हरिश्चंद्र निरगुडा यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुतार यांनी काम पाहिले, तलाठी जी. आर. वाक, ग्रामसेवक कडाळी यांनी मदत केली. आवटेंवर कारवाईचे कारणमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ३६नुसार सरपंचांनी या वित्तीय वर्षात प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायत मासिक सभा घेणे बंधनकारक आहे; परंतु सरपंच अलका आवटे यांनी वित्तीय वर्षातील सलग तीन मासिक सभा न बोलावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोशीर सरपंचपदी हरिश्चंद्र निरगुडा
By admin | Updated: May 6, 2017 06:11 IST
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे हरिश्चंद्र निरगुडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
पोशीर सरपंचपदी हरिश्चंद्र निरगुडा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}