शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुकापूरमध्ये चार इमारतींवर हातोडा

By admin | Updated: October 28, 2015 23:35 IST

तालुक्यातील अनिधकृत बांधकामांवर सिडकोने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. सिडकोने बुधवारी सुकापूर येथील चार इमारती अनधिकृत ठरवत त्या इमारती बांधताना नैना प्रकल्पाची

पनवेल : तालुक्यातील अनिधकृत बांधकामांवर सिडकोने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. सिडकोने बुधवारी सुकापूर येथील चार इमारती अनधिकृत ठरवत त्या इमारती बांधताना नैना प्रकल्पाची परवानगी न घेतल्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.पनवेल तालुक्यातील नैना क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोने आता लक्ष केंद्रित केले आहे. बांधकामांची यादी सध्या तयार करण्यात आली असून, बांधकामे तोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाने नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या पेण, पनवेल, खोपोली या तालुक्यांतील २७० नैना क्षेत्रात (नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र) सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. सिडकोने आरक्षण टाकण्यापूर्वी विकासकांनी मोकळ्या जागेत अनधिकृत टोलेजंग इमारती उभारण्यास सुरु वात केली आहे. अशा जवळपास ३०० हून अधिक बांधकामांना सिडकोने यापूर्वी नोटिसा दिलेल्या आहेत. त्याची विकासकांनी फारशी दखल घेतलेली नाही. सिडकोने पनवेल तालुक्यातील १० ते १२ बांधकामांवर आतापर्यंत कारवाई केली आहे. तरीही बांधकामांची संख्या वाढत असल्यामुळे नवीन अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या बांधकामांवर हातोडा चालविण्यात येणार आहे.सिडकोच्या अतिक्र मण विभागाने सुकापूर भगतवाडी येथील तीनमजली व दोनमजली अनधिकृत इमारतींवर कारवाई करीत इमारती जमीनदोस्त केल्या. सिडकोने वेळोवेळी नोटीस पाठवूनदेखील विकासकाने काम चालू ठेवले व कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सिडकोने अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील कारवाईला सुरु वात केली आहे. यावेळी सिडकोचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नैना प्रकल्पाची परवानगी न घेता या इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधल्या होत्या. अखेर सिडकोने दोन जेसीबीच्या आणि चार पोकलेनच्या साह्याने इमारतींवर हातोडा फिरवून जमीनदोस्त केल्या. अतिक्रमण विभागाचे सुभाष गोसावी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्यासह पोलीस, सिडकोचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)