शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या विशेष सभेत निम्मेच नगरसेवक हजर

By admin | Updated: September 29, 2015 00:51 IST

पनवेल नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन व प्लास्टिक बंदी यासाठी करण्यात आलेल्या उपविधींचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता

पनवेल : पनवेल नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन व प्लास्टिक बंदी यासाठी करण्यात आलेल्या उपविधींचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता सोमवारी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र यावेळी पालिकेच्या ४२ नगरसेवकांपैकी केवळ २६ नगरसेवक उपस्थित होते.खासगी बाजार व कत्तलखान्यात निर्माण होणारा घनकचरा, उद्योगधंद्यापासून निर्माण होणारा घनकचरा,आदीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी धारकावर असेल. कोणत्याही संस्था, हॉटेल, वर्कशॉप, गोठे, तबेले, वसतिगृहे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण होतो. या ठिकाणी निर्माण होणारा घनकचरा पालिकेने ठरवून दिलेल्या जागी स्वखर्चाने मालकाने टाकावयाचा आहे. भूखंडावर बांधकाम करताना खत कुंड्यांसाठी मालकाने जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच भोगवटाधारकास कोणत्याही प्रकारचे साहित्य सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर पालिकेच्या परवानगीशिवाय ठेवता येणार नाही. मलमूत्र विसर्जन, थुंकीद्वारे तसेच घनकचरा टाकून सार्वजनिक ठिकाणची जागा कोणासही दूषित करता येणार नाही. परवानाधारक असणारे व नसणारे फेरीवाले,भाजी व फळ विक्रेते, मत्स्य विके्रते, रसवंती गृह,चर्मोद्योगी व इतर लहान विक्र ेते इत्यादींना कचरा स्वत:च्या कचराकुंडीत ठेवून घंटागाडीत टाकणे बंधनकारक आहे. सार्वजनिक मेळावे, सभा, अधिवेशने या ठिकाणी संयोजकाने फिरत्या शौचालयाची व कचराकुंड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. यावेळी नगरसेवक लतीफ शेख यांनी पालिकेचे अधिकारी प्लास्टिकच्या पिशव्या पकडायला जायचे व पाच, दहा हजार रु पये घेत असत असा आरोप केला. पालिकेने नेमलेल्या एजन्सीने घनकचऱ्यासंबंधी एकातरी गोष्टीचे पालन केले असते तर या उपविधींची गरजच लागली नसती, असेही खडे बोल त्यांनी ऐकवले. स्वच्छतेबाबत पनवेल शहरात २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता रॅली काढण्यात येणार असून विजेत्या सोसायटीला बक्षिसे देण्यात येतील.