शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळामुळे गाजली विशेष सभा

By admin | Updated: August 26, 2015 00:43 IST

नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा गोंधळामुळे गाजली. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा गोंधळामुळे गाजली. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. गोंधळामुळे दोन तास कामकाज ठप्प झाले होते. रात्री बारा वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे महापालिकेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी दोन दिवस विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली होती. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधकांवर पलटवार केला. ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. सर्वांना अभिमान वाटावा असे महापालिकेचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश म्हात्रे यांनी पालिकेत अतिक्रमण घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे शिवसेनेचे एम. के. मढवी संतप्त झाले. त्यांनी आमदार संदीप नाईकांवर टिप्पणी केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. मढवी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नेत्रा शिर्के, सुजाता पाटील यांनी नेत्यांवरील आरोप खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. कोणत्याही स्थितीमध्ये माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या नेत्यांविषयी बोलू, असे स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहात दोन तास कामकाज ठप्प झाले. अखेर दोन तासांनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी मालमत्ता कर विभागाचे उत्पन्न वाढले. तेथील अनागोंदी कारभार थांबविण्याची मागणी केली. उत्पन्नाचे विविध मार्ग त्यांनी सुचवले. नेत्रा शिर्के, अपर्णा गवते, सूरज पाटील यांनी महापालिकेच्या चांगल्या कामाची पुस्ती जोडली. महापालिकेच्या सद्य परिस्थितीविषयी वास्तव माहिती सर्वांसमोर यावी यासाठी सभेचे आयोजन केले म्हणून स्पील ओव्हर आले असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)विरोधकांचा सभात्यागसभागृह नेते जयवंत सुतार यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाला सत्य पचत नसल्याने त्यांनी पळ काढल्याचा आरोप सभागृह नेत्यांनी केला. आरोप करायचे पण स्पष्टीकरण ऐकण्याची ताकद नसल्याचे सांगितले. अर्धा तासानंतर सभात्याग गेलेले विरोधक पुन्हा कामकाजात सहभागी झाले. भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीनसभागृह नेते जयवंत सुतार यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराचे तथ्यहीन आरोप केले जात आहेत. शहरात विरोधक कुचकामी ठरले असल्याचे स्पष्ट केले. गुन्हे दाखल करण्याची मागणीमाजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांनी पालिका प्रशासनाने जनतेची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट केले. आर्थिक दिवाळखोरीला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच आर्थिक ताळेबंद सादर करण्याची मागणी केली.