शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: July 17, 2017 01:31 IST

पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु जागोजागी मद्यपींच्या मैफली पाहून अनेकांनी तेथून परत जाणे पसंत केले. येथील विहिरीमध्येही अनेक जण उतरत असून सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेला निसर्गाचे वरदान लाभले आहे. २२ किलोमीटरचा खाडी किनारा व दिघा ते बेलापूरपर्यंतच्या डोंगररांगा आहेत. परंतु खाडी व डोंगर रांगांमध्ये पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिका व वनविभागाला अपयश आले आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील हजारो पर्यटक घणसोलीमधील गवळीदेव धबधब्यावर पावसाळी सहलीसाठी जात आहेत. शनिवार व रविवारी दोनही दिवस रोज ३ ते ४ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती. पर्यटकांची गर्दी होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी येथे काहीही उपाययोजना नाही. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. तरूणाई घोळका करून मद्यपान करत असल्याचे चित्र होते. मद्यपींना कोणाचीच भीती उरलेली नव्हती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्र घेत असतानाही त्यांना बिनधास्तपणे फोटो काढून दिले जात होते. मद्यपींमुळे गवळीदेवला कुटुंबीयांसह गेलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. या प्रकाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निसर्गाचा व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथे आलो, परंतु मद्यपींमुळे आनंदावर विरजण पडले. भांडणे होण्याच्या भीतीमुळे येथून परत जाणे पसंत केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. गवळीदेव धबधब्यावर जाताना जंगलामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये अनेक तरूण उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर्वी या विहिरीवर लोखंडी जाळी होती. परंतु चोरट्यांनी जाळी गायब केली आहे. त्यामुळे विहिरीत बुडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी गवळीदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. पर्यटकांचे साहित्य तपासून दारू जप्त केली जात होती. परंतु सद्यस्थितीमध्ये धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही. महापालिका प्रशासनाने गवळीदेवकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याशिवाय वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.