गवळी टोळीच्या गुंडाला अटक

By Admin | Updated: July 8, 2017 03:33 IST2017-07-08T03:33:39+5:302017-07-08T03:33:39+5:30

आपसातील वादातून व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या गणेश पारकरला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पारकर हा

Gavli gang kidnap arrested | गवळी टोळीच्या गुंडाला अटक

गवळी टोळीच्या गुंडाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आपसातील वादातून व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या गणेश पारकरला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पारकर हा अरुण गवळी टोळीचा गुंड असून, त्याच्याविरोधात ३०हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोपरखैरणेत घडलेल्या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने त्याला अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना कोपरखैरणेत घडली.

Web Title: Gavli gang kidnap arrested