शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांमध्ये ग्रंथदालन

By admin | Updated: August 14, 2015 23:50 IST

स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने आता शैक्षणिक दर्जा नव्या उंचीवर नेण्यासाठी पाउले उचलली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग

नवी मुंबई : स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने आता शैक्षणिक दर्जा नव्या उंचीवर नेण्यासाठी पाउले उचलली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि ‘रूम टू रीड इंडिया’ या संस्थेच्या वतीने महानगरपालिका शाळांमध्ये ग्रंथालय सुविधेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या उपक्रमातंर्गत ४० शाळांमध्ये ग्रंथ दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. शुक्रवारी वाशीतील शाळा क्र. २८, सेक्टर १५ येथे ग्रंथ दालन सुरू करण्यात आले. एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात वाढणाऱ्या या विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी या हेतूने हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथालय दालन असलेल्या शाळेतील ग्रंथालय खोलीही विद्यार्थ्यांना आकर्षित करेल तसेच त्यांचा उत्साह वाढवेल अशा प्रकारे चित्रांनी सजविण्यात आली आहे. त्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचे पाय या खोलीकडे वळतील आणि हळूहळू त्यांना वाचनाची सवय लागेल. या सर्वच खोल्यांमध्ये तीन कपाटे, चार टेबल, १००० पुस्तके, चार पुस्तक प्रदर्शन बॅग, दोन कार्पेट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ‘रूम टू रीड इंडिया’ या संस्थेचे संस्थापक सौरभ बॅनर्जी हे आहेत. ते दहा देशांमध्ये व भारतात महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. लहान वयातच मुलांची पायाभूत कौशल्ये व क्षमतांचा विकास करण्याचे उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ४० शाळांमध्ये ग्रंथालय सुविधेचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ग्रंथ दालनाच्या शुभारंभ प्रसंगी शिक्षण अधिकारी दत्तात्रेय नागरे, रूम टू रीड इंडियाचे राष्ट्रीय संचालक सौरभ बॅनर्जी, राज्य व्यवस्थापक राज शेखर, विजय वाळुंज, अजय वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. वाचनाची सवय लागली की विद्यार्थ्यांचा विकास नक्कीच होतो. त्यामुळे जीवनात वाचनाचा छंद असलाच पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका तसेच रूम टू रीडच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. सर्वच शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. - सुधाकर सोनवणे, महापौर, नवी मुंबई महानगरपालिका