शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना तीव्र विरोध

By admin | Updated: October 30, 2014 01:52 IST

ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.

ठाणो : ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे. स्टेशन परिसरात ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सवार्धिक तक्रारी आल्या आहेत. 
सवार्धिक तक्रारी फेरीवाल्यांविषयीच्या आहेत. त्यापाठोपाठ पोस्टर, बॅनरच्याही तक्रारी आल्या आहेत. परंतु, त्यावर केवळ तात्पुरती कारवाई होत आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात व सॅटीसवर या फेरीवाल्यांची गर्दी वाढत आहे. 
ठाणो महापालिकेने फेरीवाला धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आता शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, वारंवार मुदतवाढ देऊनही फेरीवाल्यांकडून या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ खराब करणा:या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांविरोधात किंवा रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकणा:यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले होते. परंतु तरीही फेरीवाले वाढतच आहेत. तक्रारी आल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते. परंतु, फेरीवाले पुन्हा येतात. पोस्टर, बॅनर व होर्डिग्जसंदर्भातील  तक्रारींवरसुद्धा कारवाई झाली  की नाही, याचे उत्तर मात्र पालिकेकडे नाही. महापालिकेने वर्षभरापूर्वी अनधिकृत बांधकामांसंदर्भात टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. यावर मागील वर्षात 193 तक्रारी आल्या. यातील काही बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, यंदा आतार्पयत या क्रमांकावर 46 तक्रारी आल्या आहेत. सर्वाधिक 14 तक्रारी या मुंब्य्रातील आहेत. त्याखालोखाल वर्तकनगरमधून 1क्, वागळे  इस्टेटमधून तीन, रायलादेवी परिसरातून दोन, माजिवडा- मानपाडा येथून दोन, कळव्यातून दोन आणि कोपरीतून एका तक्रार आली आहे. नौपाडा आणि उथळसर प्रभाग समित्यांमधून एकही तक्रार आलेली नाही. असे असताना एकाही बांधकामावर कारवाई झालेली नाही. 
8क् टक्के कर्मचारी निवडणुकीत व्यग्र  होता. त्यामुळे कारवाई करता आली नाही, अशी माहिती पालिकेने दिली. परंतु, येत्या काही दिवसांत या तक्रारींवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. 
 
एखादा फेरीवाला कचरा करून तो उचलत नसेल आणि ते एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास आले तर त्याने मनपाच्या 18क्क्2221क्8 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेने केले होते. 2 सप्टेंबर 2क्14 रोजी हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला होता.