अल्पवयीन मुलीवर पित्याचा सहा वर्षे बलात्कार

By Admin | Updated: July 22, 2015 02:31 IST2015-07-22T02:31:01+5:302015-07-22T02:31:01+5:30

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. समाजसेवी संस्थेने शाळेत केलेल्या सर्व्हेमध्ये

Father's rape on a minor girl for six years | अल्पवयीन मुलीवर पित्याचा सहा वर्षे बलात्कार

अल्पवयीन मुलीवर पित्याचा सहा वर्षे बलात्कार

नवी मुंबई : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. समाजसेवी संस्थेने शाळेत केलेल्या सर्व्हेमध्ये हा प्रकार उघडकीस आला. जुहूगाव येथील या १३ वर्षीय मुलीला तिची आईच गर्भनिरोधक गोळ्या देऊन पतीचे कृत्य दडपत होती, हेदेखील स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली.
‘चेतना फाउंडेशन’च्या वतीने शाळांना भेट देऊन विद्यार्थिनींकडे विचारपूस करण्यात येत असे. त्यात वाशीतील मुलीने वडीलच बलात्कार करत असल्याचे सांगितले. आई-वडील भाजीचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली व तीन मुले आहेत. सातव्या वर्षापासून ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली. कोपरी येथे १४ वर्षीय मुलीवर पिता-पुत्राने बलात्कार केल्याची घटना एप्रिलमध्ये उघड झाली होती.

Web Title: Father's rape on a minor girl for six years