शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सरल प्रणालीसाठी शिक्षकांना पाहिजे मुदतवाढ

By admin | Updated: September 26, 2015 00:50 IST

राज्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची आॅनलाईन माहिती सरल प्रणालीने भरण्याचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे.

भिवंडी : राज्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची आॅनलाईन माहिती सरल प्रणालीने भरण्याचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सव व बकरी ईद सणांच्या सुट्ट्या असल्याने या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्यकार्यकारणी सदस्य सुधीर घागस यांनी पत्राद्वारे केली आहे. जुलै महिन्यापासून सरलप्रणाली डेटाइंट्रीचे काम राज्यातील शाळांमधून सुरू आहे. या काळात संगणकावर सर्व्हर डाटा डाऊनलोड होण्यासारख्या तांत्रिक काम संथगतीने सुरू होते. या अडचणीची नोंद घेऊन शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी राज्यात विभागनिहाय मुदत वाढ दिली. ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा या विभागासाठी २४ ते २८ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला. वास्तविक कोकणपट्टयात गणेशोत्सव व बकरी ईद या दोन्ही सणांना जास्त महत्त्व दिले जाते आणि लोक आपापल्या गावी जाऊन सणांमध्ये सहभागी होतात. सणांंमुळे २४ ते २८ सप्टेंबर हा कालावधी अडचणीचा ठरला असल्याने सरल प्रणालीची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण मंत्री विनोद तावडे,शालेय शिक्षण प्रधान सचीव नंदकुमार,शिक्षण आयुक्त पुरषोत्तम भापकर,आमदार रामनाथ मोते यांना दिले आहे. (प्रतिनिधी)