शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाबाहेर खासगी वाहनांचे अतिक्रमण

By admin | Updated: March 17, 2017 05:55 IST

सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात खासगी वाहनांचे अतिक्रमण ही नवी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी मेट्रोचे काम सुरू

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात खासगी वाहनांचे अतिक्रमण ही नवी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रवाशांना स्थानकाकडे जाण्याकरिता वाट काढणे मुश्कील होते. एका बाजूने रिक्षाचालकांचा थांबा तर दुसरीकडे ओला, उबेरसारखी खासगी वाहने तळ ठोकून असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रेल्वे स्थानक परिसरातून ओला, उबेर सारख्या खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रवाशांच्या प्रतीक्षेत वाहनचालक या ठिकाणी गाड्या उभ्या करत असल्याचा प्रकार पाहायला मिळतो. ऐन कार्यालयीन वेळेत या ठिकाणी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या चारचाकी वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी पार्किंगची सोय होत नसल्याने सकाळच्या वेळी या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची दुचाकी वाहने रेल्वे स्थानक परिसरात उभी केली जात असून महापालिकेच्या वतीने या ठिकाणी ठोस कारवाई केली जात नसल्याची नाराजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. स्थानकाच्या आतील बाजूसही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जात असून याकडे गांभीर्याने लक्ष घेतले जात नाही. पे अ‍ॅण्ड पार्क ऐवजी रेल्वे स्थानक परिसरातच गाड्या उभ्या केल्या जात असल्याने येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना, रिक्षाचालकांना मार्ग काढणे अवघड होत असल्याची तक्रार येथील रिक्षाचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)