शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: November 11, 2015 00:25 IST

सिडकोने वितरीत न केलेल्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत इमारती उभारण्याचे काम शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐन दिवाळीत अशा अनधिकृत इमारतींमधील

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईसिडकोने वितरीत न केलेल्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत इमारती उभारण्याचे काम शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐन दिवाळीत अशा अनधिकृत इमारतींमधील घरांची विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे.दिघा येथील अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेतल्याने त्यावर कारवाईनंतर शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. तर इतरही अनेकांवर भविष्यात तेच संकट येण्याची शक्यता आहे. सदर प्रकारामुळे शहरातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत इमारती उभारण्याचे काम भूमाफियांकडून सुरुच असल्याचे दिसत आहे. खाजगी विकासकांमार्फत राबवल्या जाणाऱ्या या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून सिडकोचे वितरीत न झालेले भूखंड हडपले जात असल्याचा प्रकार सुरु आहे. अशा भूखंडावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. त्यामध्ये घणसोली, कोपरखैरणे तसेच बेलापूर येथील गावठाणलगत साडेबारा टक्के अंतर्गत वाटपासाठी ठेवलेल्या बहुतांश भूखंडांचा समावेश आहे. त्यापैकी कोपरखैरणे येथील एक प्रकार उघडकीस आला आहे. सेक्टर ११ येथील ११४ क्रमांकाच्या भूखंडावर ब्ल्यू व्हॅली नावाची चार मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून ऐन दिवाळीपूर्वी त्यामधील घरांची विक्री झालेली आहे. नव्या घराच्या शोधात असलेले अनेक जण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नव्या घरात रहायला जाणे पसंत करतात. यानुसार सदर इमारतीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून काहींनी गृहप्रवेश देखील केला आहे. सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांना त्यांना या घरांची विक्री झालेली आहे.काही खाजगी विकासक मिळून हा प्रकार करत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांच्या घणसोली येथील कार्यालयातून या घरांच्या विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. त्याठिकाणी अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असताना सिडकोनेही केवळ नोटीस देऊन त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याठिकाणी अनेकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेळीच बांधकाम पाडणे आवश्यक असतानाही तसे झालेले नाही. त्यामध्ये संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे या भूमाफियांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बेलापूर, घणसोली व कोपरी येथे ८ ते १२ मजली इमारती उभारलेल्या असल्याचे देखील सूत्रांकडून समजते. यामुळे अनधिकृत इमारती उभारुन त्यामधील विकलेल्या घरांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे. शिवाय घरे घेणाऱ्या नागरिकांचीही फसवणूक केलेली आहे.